गुंतवणुकीच्या नावाने ८५ लाखांची केली फसवणूक
पिंपरी (रफिक शेख) : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल. गुंतवणूक केलेल्या पैशाचे दोन ते तीन वर्षांमध्ये दाम दुप्पट रक्कम देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीने ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. ही घटना २०१४ ते २०१९ या कालावधीत हॉटेल रानमळा वाल्हेकरवाडी येथे घडली. महेंद्र महादू वाघेरे (वय ४४, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश पांडुरंग पाळेकर (४७, रा. वळवण, लोणावळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.