बिटकॉइन न देता तरुणाची २० लाखांची फसवणूक
पुणे (प्रकाश इगवे) : दीड बिटकॉइनसाठी बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉइन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी रंजित जनैलसिंह (३७, रा. मीरा भाईंदर, ठाणे), शब्बीर शेख (४१, रा. मीरा रोड, इस्ट), सुजॉय पॉल (रा. हांडेवाडी), मंगेश कदम (रा. गोखलेनगर), मुकुल (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना बिटकॉइन घेऊन देतो असे सांगितले. १९ नोव्हेंबर २०२० रोजी बिटकॉइनचा दर एका बिटकॉइनला साधारण साडेदहा लाख रुपये होता. दीड बिटकॉइनसाठी फिर्यादी यांनी रंजित जनैलसिंह याच्या बँक खात्यावर १९ लाख ७० हजार ८८६ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे बिटकॉइन दिले नाहीत.