पाटील खडी केंद्राचा माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शुभारंभ !
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे युवा नेते सुरज पाटील यांच्या खडीपासुन वाळू तयार करण्याच्या खडी केंद्राचा शुभारंभ नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे चिरंजिव तथा युवा नेते सूरजभैय्या पाटील आता पुन्हा एकदा व्यवसाय सुरू करणाऱ्या युवकांसाठी उदाहरण बनले आहेत. खडीच्या व्यवसायामध्ये देखील आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो या विचाराने त्यांनी पाटील खडी केंद्र सुरू केले. या खडी केंद्राचा उद्घाटन सोहळा नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते पार पडला.
आजकालचे युवक नोकरीच्या मागे पळत असताना अशा पद्धतीने व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेणे म्हणजे खरोखर कौतुकास्पद बाब आहे. हे खडी केंद्र अत्याधुनिक पद्धतीने वाळू तयार करणारे परिसरातील एकमेव ठिकाण आहे ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे असे गौरव उद्गार उद्घाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी काढले यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहुन सूरज भैय्या पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच साहेबराव जाधव साहेब, युवराजभैय्या पाटील, शिवानंदजी हेंगणे, शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, माधवराव जाधव, शिवाजीराव खांडेकर, तुकाराम पाटील,दयानंद सुरवसे,पुरोषतम पुरोहित,शरण चवंडा,अभय मिरकले,बाबुराव उडतेवार,व मान्यवर उपस्थित होते.