सामाजिक बांधिलकी म्हणून पानपोई – डॉ.शरदकुमार तेलगाणे

सामाजिक बांधिलकी म्हणून पानपोई - डॉ.शरदकुमार तेलगाणे

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली असून बाहेरगावाहून उदगीरात येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. या सामाजिक भावनेने राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उदगीर येथील ख्यातनाम स्त्री रोग तज्ञ तथा प्रबोधनकार, कीर्तनकार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ .शरदकुमार तेलगाणे बोलत होते. याप्रसंगी केशव भोसले, गजीले मामा, अमोल माने, बालाजी श्रीमंगले, श्री मदने, श्री सुरवसे, संतोष गाजरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण या समाजाचे काही देणे लागतो. ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करता यावी या हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पानपोई ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
डॉक्टर तेलगाने हे सामाजिक जाणिवा जपतात आणि समाजासाठी सतत प्रयत्नरत असतात. असे संतोष गाजरे यांनी सांगितले.परिसरातील नागरिकांनी डाॅ.तेलगाणे यांचे आभार व्यक्त केले.

About The Author