विद्रोही साहित्य संमेलनास अडथळा सहन करणार नाही – निवृत्ती सांगवे

विद्रोही साहित्य संमेलनास अडथळा सहन करणार नाही - निवृत्ती सांगवे

उदगीर : उदगीर येथे संपन्न होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनास कांही राजकिय लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.हे साहित्य संंमेलन अनेक प्रस्थापितांना सलत आहे.त्या मुळे राजकिय शक्तीचा वापर करून अडथळे आणले जात आहेत.पण आता या पुढे असे प्रकार खपऊन घेतले जाणार नाहीत.असा ईशारा राष्ट्रीय दलीत अधिकार मंचचे प्रदेश अध्यक्ष तथा विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य संंयोजक ,नगर सेवक निवृती सांगवे सोनकांबळे यांनी दिला आहे.

उदगीर शहरात येत्या २२ ते २४ एप्रिल दरम्यान ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन असे दोन संमेलने एकाच वेळी आयोजित करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हा परिषद शाळेचे मैदान विद्रोही साहित्य संमेलनाला मिळू न देण्याचा कुटील डाव अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने शुक्रवारी ( दि. २५ ) एक जाहीर प्रसिद्धी पत्रक काढून करण्यात आला आहे.  

     उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे दिनांक २२ ते २४ एप्रिल दरम्यान ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष उदगीरचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे हे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर हे कार्याध्यक्ष आहेत. उदगीरात होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्रशासनातील जिल्हाधिकारी , जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी , अप्पर जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी , उपविभागीय पोलिस अधिकारी , तहसीलदार , गटविकास अधिकारी , न. प. मुख्याधिकारी अशा विविध विभागाच्या अधिकार्‍यांच्या अनेक बैठका पार पडलेल्या आहेत. तसेच सामाजिक , राजकीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याही बैठका झाल्या आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे नियोजनाच्या अनुषंगाने अनेक बैठका घेत आहेत. दरम्यान खा. सुधाकर शृंगारे , माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर , भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड , शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आदी लोकप्रतिनिधींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. एकंदरीत उदगीरात होणारे ९५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होताना दिसून येत आहेत.

     तर दुसरीकडे दिनांक २३ व २४ एप्रिल रोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी उदगीरात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्याचवेळी विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येथील डॉ. अंजुम कादरी यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरून विद्रोही मराठी साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या दोन्ही आयोजकामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शुक्रवारी ( दि. २५ ) विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलन स्थळामध्ये अडथळा निर्माण करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांकडून हिणकस प्रयत्न होत असल्याचा आरोप जाहीर प्रसिद्धी पत्रक काढून करण्यात आला आहे. या पत्रकामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी यांनी विद्रोही साहित्य संमेलनासाठी उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचे मैदान घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापकाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मैदान विद्रोही साहित्य संमेलनासाठी मिळावे अशी मागणी करून जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र देऊन उदगीर पंचायत समितीकडे अर्जाद्वारे मागणी केली. विद्रोहीच्या मागणीनंतर तासाभरातच पंचायत समितीने जिल्हा परिषदेचे मैदान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिनांक १९ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत देण्यात आल्याचे पत्र विद्रोहीच्या संयोजकांना देऊन कळविण्यात आले. जिल्हा परिषद प्रशालेचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पंचायत समितीकडे मैदानाची मागणी करण्यात येते. त्यानंतर पंचायत समिती मैदानाची परवानगी देते. विद्रोही संमेलन आयोजकांकडून मैदानाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जागेची मागणी करण्यात आली असता गटविकास अधिकारी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मैदान दिले आहे. जिल्हा परिषद मैदानापासून अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थळ चार की. मी. दूरवर असलेल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आहे. परंतु असे असतानाही  अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजकांना जिल्हा परिषद मैदान कोणत्या कारणासाठी हवे आहे ? असा प्रश्न विद्रोही कडून उपस्थित करण्यात आला आहे. उदगीरात होणाऱ्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला कुठेही जागा मिळू नये असा कुटील डाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांकडून होत असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने करण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनासाठी जागा न देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , लातूर जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रसिद्धी पत्रकावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी , राज्य संघटक किशोर ढमाले , सेक्रेटरी यशवंत मकरंद , विद्रोही संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी , दलित अधिकार अभियानचे निवृत्ती सांगवे , संभाजी ब्रिगेडचे अतुल काकडे , सिद्धेश्वर लांडगे , अहमद सरवर , प्रा. व्यंकट सूर्यवंशी , अंकुश सिंदगीकर , सतीश नाईकवाडे , श्रीनिवास एकुर्केकर , सरफराज अहमद , प्रदीप ढगे , बाबासाहेब एकुर्केकर यांची नावे आहेत. 

About The Author