डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी सुरज बाबासाहेब पाटील तर सचिव पदी धर्मपाल सरवदे
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी सुरज बाबासाहेब पाटील, उपाध्यक्षपदी प्रताप पाटील, युवराज पाटील कार्याध्यक्ष कोंडीबा पडोळे तर सचिव पदी धर्मपाल सरवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवार दिनांक 3 रोजी सायंकाळी 6 वाजता अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्री महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मार्गदर्शक माधव सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन 131 व्या जयंतीनिमित्त कार्यकारिणी गठित करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणी सहसचिव मल्लिकार्जुन स्वामी, राहुल वाघमारे कोषाध्यक्ष रमाकांत भातीकरे, दत्ता पाटील संघटक भगवान कांबळे,शिवाजी सरवदे,शादुल शेख, दिलीप कांबळे प्रसिद्धीप्रमुख बाबुराव श्रीमंगले, राजकुमार सोमवंशी, राहुल तीगोटे, बालाजी पडोळे, दिलीप मोरे स्वागत अध्यक्ष माधव सरवदे,बळीराम मोरे सदस्य अविनाश गरडे, किसन कापसे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांची निवड होताच छत्रपती शाहू महाराज युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बळीराम मोरे यांच्या वतीने कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व निर्बंध हटवल्या मुळे दोन वर्षानंतर यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.ह्या निमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष सुरज बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी गिरी महाराज, राहुल उगिले, संतोष महापुरे, युवराज शिंदे, बालाजी तीडोळे, प्रकाश सरवदे, विशाल सरवदे, नवनाथ वाघमारे, शेखर तोगरे, अंशुल सरवदे,राजेश सरवदे, नागेश सरवदे, प्रशांत कांबळे, शिवाजी बनसोडे, ऋषिकेश सरवदे नितिन कांबळे,अशोक वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.