स्वेच्छा निवृत्तीनंतरही बँकेच्या वाटचालीसाठी जाधव यांचे सहकार्य राहील – शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : गेल्या 24 वर्षापूर्वी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून अमरदीप जाधव यांचे बँकेसाठी योगदान लाभलेले आहे. बँकेच्या क्लार्क पदापासून ते मॅनेजर, कार्यकारी संचालक पदापर्यंत त्यांनी यशस्वीपणे वाटचाल केलेली आहे. बँकेच्या कार्याशी एकनिष्ठ राहून अहमदपूर शाखेनंतर लातूरच्या शाखेची यशस्वी वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. सध्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागत आहे. परंतु स्वेच्छा निवृत्तीनंतरही बँकेच्या वाटचालीसाठी त्यांचे सहकार्य कायम राहील असे प्रतिपादन एम.एन.एस.बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी एम.एन.एस. बँकेचे कार्यकारी संचालक अमरदीप जाधव यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, बाबासाहेब कोरे, रविंद्र कांबळे, प्र.कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, जनरल मॅनेजर किशनसिंह गहिवार, ऑडीट हेड नितीन सराफ, वसूली हेड व्ही.बी.सुरवसे, मायक्रो फायणांन्स प्रमुख महादेवी बेलूरे, मार्केटिंग विभाग प्रमुख मनोज क्षिरसागर, मार्केट यार्ड शाखेचे मॅनेजर शिवाजी सूर्यवंशी, विवेकानंद शाखेचे मॅनेजर गणेश पवार, अहमदपूर शाखेचे मॅनेजर प्रविण जाधव, शिरूर अनंतपाळ शाखेचे मॅनेजर प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, अमरदीप जाधव हे प्रकृती स्वास्थ्यामुळे सेवानिवृत्त होत असले तरी आतापर्यंत कुटुंबातील व्यक्ती समजून त्यांच्या परिवाराशी आमचे ऋणानुबंध कायम राहिलेले आहेत. यापुढील कालावधीतही त्यांचे सहकार्य राहील. बँकेच्या कार्याला गती देण्यासाठी त्यांच्या जागी प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून बाळासाहेब माहिते यांची निवड केल्याची घोषणाही त्यांनी यावेळी बोलताना केली. प्रारंभी एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेचे संचालक बाबासाहेब कोरे, बँकेचे नुतन प्रभारी एम.डी. बाळासाहेब मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केली. तसेच बँकेचे नुतन कार्यकारी संचालक म्हणून बाळासाहेब मोहिते यांनी निवड करून त्यांना या संबंधीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
सेवेबद्दल कायम ऋणी राहीन – अमरदीप जाधव
एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मला कव्हा गावातील सुशिक्षीत तरूण म्हणून बँकेच्या विविध पदावर काम करण्याची संधी दिली. तसेच सेवेतील सातत्य, कर्तव्यनिष्ठता पाहून बँकेच्या कार्यकारी संचालक पदीही काम करण्याची संधी दिली. त्या सेवेबद्दल मी कायम ऋणी राहीन असे भावना बँकेचे माजी कार्यकारी संचालक अमरदीज जाधव यांनी व्यक्त केली.
बँकेची प्रतीमा उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील – बाळासाहेब मोहिते
बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.कव्हेकर यांनी मला बँकेच्या विविध पदावर काम करण्याची संधी दिली. तसेच सध्या प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून माझी नियुक्ती केली. जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीही मला बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोनं करीत व बँकेच्या विश्वासास पात्र राहून बँकेची प्रतीमा उंचाविण्यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन बँकेचे नुतन प्रभारी कार्यकारी संचालक बाळासाहेब माहिते यांनी केले.