पक्षीमित्र महेबुब चाचा यांच्या पत्नीचे कोरोना मध्ये निधन झाले; शासनाच्या मिळालेल्या मदतीचे पक्ष्यांसाठी सर्व पैसे खर्च केले
लातूर (प्रतिनिधी) : पक्षीमित्र महेबुब चाचा यांच्या पत्नी मेहरुन्निसा महेबुब सैय्यद (चाची मेहरुन्निसा) यांचे गेल्या वर्षी दि.15/4/2021रोजी कोरोना ने निधन झाले होते. कोरोना ने मृत्यु पावलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना शासना कडुन मदत म्हणून पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. दोन महीन्या पुर्वी महेबुब चाचा यांनाही मदत म्हणून शासनाचे अनुदान पन्नास हजार रुपए मिळाले मिळालेल्या मदतीच्या पैशातुन महेबुब चाचा यांनी स्वताह साठी एक रुपाया ही खर्च न करता गेल्या महिन्यात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी म्हणून बारा हजार रुपयांच्या मातीच्या (400) कुंड्या आणी दहा हजार रुपये किंमतीचे मोठ्ठी झाडे ट्री गार्ड सहीत वृक्षारोपण केले असुन दि.3/4/2022 रोजी आणखीन बारा हजार रुपये किंमतीच्या मातीच्या (400) कुंड्या नागरिकांन मधे मोफत वाटण्याचे काम सुरू केले. उर्वरित राहिलेले पैसे ते त्यांच्या कडे येणाऱ्या जख्मी आजारी पशु पक्ष्यांच्या औषधोपचार आणि चारा पाण्याचा सेवेत लावत आहेत.
ते एक छोटा हाथी मालवाहू टेम्पो चालवुन आपल्या उदर निर्वाह करतात भाड्यातुन मिळालेल्या पैशातून स्वता साठी खान्या पिण्यासाठी लागणार तेवढे पैसे खर्च करतात आणि राहीलेल्या चार पैशातून झाडे लावणे पशु पक्षी वाचविणे किंवा गरजुंना मदत करण्याचे ते कार्य करतात त्यांच्या या कार्यामुळे ते लातूरात सर्वांनाच्यांच परिचयाचे आहेत सर्व जण त्यांचा मान सन्मान करतात त्यांच्या कडे आदराने पाहतात. दि.6/4/2022 सकाळी सात वाजता दीपकजी गटागट योग वर्ग नाना नानी पार्क ग्रुपच्या वतीने महेबुब चाचा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महेबुब चाचा यांनी योग वर्ग च्या सर्व मेंबर्स ना पक्ष्यांना पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी साठी मुक्या जिवांच्या सेवेत मातीच्या कांही कुंड्या निःशुल्क भेट दिल्या.