लातूर ग्रामीण ‘संगांयो’चे ६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान पात्र निराधारांना मंजूरी पत्राचे वितरण

लातूर ग्रामीण 'संगांयो'चे ६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान पात्र निराधारांना मंजूरी पत्राचे वितरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धिरज देशमुख व सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान

लातूर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना ग्रामीण च्या वतीने लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरजभैय्या विलासरावजी देशमुख व सहकारमहर्षी तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना दिनांक ०६ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान घरपोच मंजूर पत्र वितरण अभियान राबविण्यात येणार असून याची सुरुवात दि.०६.०४.२०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या शुभहस्ते व तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिऊर, ता. लातूर या गावातील निराधारांना मंजूर पत्र देऊन होणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका लातूर ग्रामीण चे चेअरमन प्रवीण हणमंतराव पाटील यांनी दिली आहे.

निराधारांना घरपोच संजय गांधी निराधार योजना अर्ज देण्यापासून ते निराधारांना घरपोच मंजुरी पत्र देण्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती तालुका:लातूर (ग्रामीण)चे सदस्य सर्वश्री अमोल देडे, सौ.शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटील व आकाश कणसे यांच्यासह सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व आजी-माजी पदाधिकारी गावातील संजय गांधी निराधार योजना समन्वयक परिश्रम घेत आहेत अशी माहिती प्रवीण पाटील यांनी दिली.

About The Author