महाराष्ट्रात जी एम बियाण्यांच्या चाचण्या सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संमती द्यावी

महाराष्ट्रात जी एम बियाण्यांच्या चाचण्या सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संमती द्यावी

दिल्ली (प्रतिनिधी) : कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने मुल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी सुरु करावी व शेतीसाठी दर्जेदार वीज पुरवठा करण्यात यावा या विषयां संबंधी चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अनिल घनवट व शेतकरी महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे यांनी दि. ५ एप्रिल रोजी दिल्ली येथे खा. शरद पवार यांची भेट घेतली.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे व राज्याचे कृषी सचीव एकनाथ डवले हे सुद्धा चर्चेच्यावेळी उपस्थित होते. जी. एम. च्या बाबतीत लवकरच मुख्यमंत्री व संबंधीत विभागांची बैठक घेऊन नाहरकत देण्यात येईल अशी खात्री त्यांनी दिली.

कांदा खरेदी बाबत केंद्र शासनाशी बोलून लवकरात लवकर नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करावी अशी मागणी अनिल घनवट यांनी केली.

शेतीसाठी पुर्ण दाबाने व पुरेसा वीज पुरवठा करण्यासाठी खाजगी कंपन्यांना सौरऊर्जेचा वापर करून विज निर्मती व पुरवठ्याच्या शक्यते बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या सह शेतकरी महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे उपस्थित होत्या.

About The Author