परिश्रम, जिद्द आणि चिकाटी हीच यशाची गुरूकिल्ली -प्राचार्या रेखाताई तरडे

परिश्रम, जिद्द आणि चिकाटी हीच यशाची गुरूकिल्ली -प्राचार्या रेखाताई तरडे

पु.अहिल्यादेवी माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा गौरव सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : आज सगळीकडे गुणवत्तेला, ज्ञानाला महत्त्वाचे स्थान असून एकेक गुणांसाठी अतिशय स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर आपल्या मध्ये परिश्रम करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव तथा माजी जि प सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे मॅडम यांनी केले. ते सांगवी सुनेगाव येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि.२८ रोजी आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिंडे भास्कर, श्री व सौ संपत्ते शिवकन्या मधुकर, लोहकरे संभाजीराव,श्री व सौ तांदळे शोभा रमाकांत, देशोन्नती चे पत्रकार शरद कासले, तेजस दिंडे, ॠतुजा संपत्ते, प्रवीण तांदळे, कौशल्या देवकते, संजय पाटील आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना रेखाताई तरडे म्हणाले की, या विद्यार्थ्यानी जे यश संपादन केले आहे ते त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या पालकांच्या कठोर तपश्चर्येमुळे. नीटच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात आता ही गुणवंत मुलं आपापल्या महाविद्यालयात नावलौकिक कमावतील यात शंका नाही. यावेळी एम .बी. बी. एस. ला प्रवेश मिळाल्यामुळे तेजस दिंडे आणि सुदर्शन लोहकरे यांचा तर बी.ए.एम.एस.ला प्रवेश मिळाल्यामुळे ॠतुजा संपत्ते आणि प्रवीण तांदळे यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तेजस दिंडे ,सुदर्शन लोहकरे आणि प्रवीण तांदळे यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाबाबतीत सुंदर मार्गदर्शन केले. तर पालक प्रतिनिधी म्हणून कौशल्या देवकते यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. तसेच पौष पौर्णिमा असल्याने आणि तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने दैवशाला शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मुळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवशाला शिंदे यांनी केले तर आभार शेख जिलानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश चेपूरे, संभाजी दुर्गे, अच्यूत सुरनर,राजाराम बुर्ले, राजकुमार पनाळे, तुकाराम शिंगडे, अमोल सारोळे, प्रदीप रेड्डी, जनार्धन मासुळे, मिनल गोगडे, चिंतन गिरी, गजानन फुलारी, गणेश जाधव, हिदायत शेख, विश्वंभर सुरनर, विवेकानंद सुरनर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!