केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून 100% नळपट्टी व घरपट्टी वसुली

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून 100% नळपट्टी व घरपट्टी वसुली

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडीचे सुपुत्र जि.प. सदस्य अशोक काका केंद्रे व माजी सभापती अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करत असलेल्या ग्रामपंचायत केंद्रेवाडी येथील गावकऱ्यांना दोघांनी आव्हान केले व गावकऱ्यांनी या आव्हानाला उत्तम प्रतिसाद दिला व गाव 100% नळपट्टी , घरपट्टी वसूल करणारे गाव ठरले यात सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ ज्योती बालाजी केंद्रे ग्रामसेवक मोहन श्रीपती केंद्रे अहमदपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पट्टेवाड ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणीबाई भानुदास केंद्रे पुष्पा प्रकाश केंद्रे ज्ञानोबा भास्कर केंद्रे भानुदास रंगनाथ केंद्रे तुकाराम मनोहर केंद्रे तसेच केंद्रेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे , सेवानिवृत्त शिक्षक भानदास केंद्रे बालाजी केंद्रे नागनाथ केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे आदींनी घरपट्टी व नळपट्टी वसूल करण्यासाठी गावकऱ्यांना वेळोवेळी समुपदेशन करून जनजागृती करून प्रत्येक घरोघरी जाऊन ही कर वसुली केली आहे केंद्रेवाडी गाव तालुक्यातील 100% घरपट्टी व पाणीपट्टी देणारे गाव ठरले आहे केंद्रेवाडी एक आदर्श गाव आहे या गावात उच्चशिक्षित नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे या गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व आपला न चुकता घरपट्टी वनस्पतीचा कर भरला या अगोदर गावाला भरपूर पुरस्कार प्राप्त झाले आहेत आतापर्यंत गावांमध्ये 3200 वृक्षांची लागवड झालेली आहे रस्ते ,नाल्या , खांब तेथे फोकस सुंदर कार्यालय अशा विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव सुंदर गाव असे विविध योजनांची अंमलबजावणी करून केंद्रेवाडी गाव आदर्श गाव बनण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय व सर्व गावकरी मंडळी अहोरात्र प्रयत्न करत आहेत अशोक काका केंद्रे सौं अयोध्याताई केंद्रे यांचा गावाच्या विकासासाठी सिंहाचा वाटा आहे येत्या काही दिवसात हे गाव आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाईल असा विश्वास सरपंच व ग्रामसेवक यांनी व्यक्त केला आहे

About The Author