चिमणी व पक्षासाठी ज्ञानदीप अकॅडमी येथे चारा पाण्याची सोय
अहमदपूर (गोविंद काळे) : एप्रिल महिना चालू झाला आहे आता उन खुप वाढले आहे . पशु पक्षाना पाणी मिळेनासे झाले आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नुकतेच ज्ञानदीप अकॅडमीच्या 10 व्या वर्धापन दीनाचे औचित्य साधून अकॅडमीच्य वतीने झाडांना टिनचे डब्बे बांधून मध्यभागी पाणी आणि चार अन्नाचे खापे बनवले आहेत त्यामध्ये तांदूळ, गहू, दाळ व साखर टाकली जाते. मुंग्यांची जागा पाहून त्यांना साखर टाकली जाते. आणि जमिनीवर व मुंग्यांना पाणी ठेवले जाते. आणि हे कार्य अकॅडमीचे विद्यार्थी दररोज दोन वेळा करतात. झाडांना पाणी आणि पक्षांना खाऊची सोय केल्यामुळे पक्षाचा किलबिलाट मोठया प्रमाणात वाढला आहे.
एका बाजूला अकॅडमीतील मुलांचा किलबिलाट तर दुसऱ्या बाजूला पक्षांचा किलबिलाट खुप रम्य वाटते. अशा निसर्ग रम्य वातावणात राहण्याची वेगळीच काही मजा आहे. विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळते मोठे मोठे थंड झाडे त्या खाली बसून अभ्यास करणे व सोबतच पक्षांचा किलबिलाट यामुळे विद्यार्थ्यांचा छान अभ्यास होतो असे मनोगत अकॅडमीचे संचालक उध्दव इप्पर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना आपले मत व्यक्त केले.