धक्कादायक; वयोवृद्ध महिलेचा गळा कापून हत्येचा प्रयत्न, महागाव तालुक्यातील घोनसरा येथील घटना

धक्कादायक; वयोवृद्ध महिलेचा गळा कापून हत्येचा प्रयत्न, महागाव तालुक्यातील घोनसरा येथील घटना

यवतमाळ/महागाव : महागाव तालुक्यातील घोन्सरा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोन्सरा येथे राहणाऱ्या ८० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची चोरी च्या उददे्शाने घरात घुसून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे या मध्ये ती वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक ११/ एप्रिल रोजी रात्री ११,३० वाजता चावळीबाई सुखा चव्हाण रा. घोन्सरा ता, महागाव ही एकटीच राहत असल्याने यांच्या घरी काही अज्ञात व्यक्तीनी प्रवेश केला. त्यांनी चावळीबाई च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या मध्ये चावळीबाई च्या गळ्यावर मोठी दुखापत झाली असून सुदैवाने प्राण बचावले. अंगावरील ४० तोळे वजनाचे चांदीचे दागिने चोरी करुन मारेकरी पळून गेले. चावळीबाई यांना उपचाराकरिता पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्ह्याची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे करण्यात आली. या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध सुरु आहे. चावळीबाई यांची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि. मोतीराम बोडके यांनी व्यक्त केला. पुढील तपास सुरू आहे.

About The Author

error: Content is protected !!