देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन व सॅटेलाईट केंद्राचे उदघाटन
माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन, लाईफ लाँग लर्निंग सॅटेलाईट केंद्राचे उद्घाटन, एमएनएस बँकेअंतर्गत बांगलादेशी मा.युनूस अहेमद प्रणित महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रमाता जिजाऊ स्वाभिमानी योजनेच्या दूसर्या टप्प्याचा शुभारंभ व भारतीय अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव अशा अनेक विकास कामांचा शुभारंभ 13 एप्रिल 2022 रोजी दूपारी 3.30 वाजता विवेकानंदपूरम् शैक्षणिक संकूल, कळंब रोड, पीव्हीआर चौक, लातूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय मंत्री मा.ना.रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. अशी माहिती भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारशी संवाद साधताना दिली.
शिक्षणाचा लातूर पॅटर्न असलेल्या लातूर शहरातील शिक्षणाची गरज लक्षात घेवून गेल्या ३८ वर्षापूर्वी १९८३ ला जेएसपीएम संस्थेची स्थापना करण्यात आली. लातूरसह महाराष्ट्राच्या पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, रेणापूर अशा विविध शहरामध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, पॉलिटेक्निक, नर्सिंग, व्होकेशनल कॉलेज, माध्यमिक व सीबीएसई स्कूल अराईज अॅकडमी लातूर नांदेड, अत्यंत गुणवत्तापूर्ण चालविले जात आहे. अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षणाद्वारे तेजस्वी विद्यार्थी घडविणे हे संस्थेचे व्हिजन आहे. प्रामाणिकता, मानवता हाच धर्म व टॅयालेट स्कील गुणवत्ता हीच जात आहे संस्थेचे ३० युनिट विविध ठिकाणी चालत असून ८०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ व १५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकचा निकाल गेल्या सहा वर्षापासून १०० टक्के असून या कॉलेजचे ३०० विद्यार्थी विविध कंपन्यामध्ये सर्व्हिससाठी कॅम्पसमधून गेले आहेत. बीएस्स्सी नर्सिंगची विद्यार्थीनी कु.राणी काळे ही राज्यात पहिली आली असून स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचा निकाल गेल्या आठ वर्षापासून १०० टक्के आहे.
जेएसपीएम संचलित स्वामी विवेकांनद विद्यालय, महाराष्ट्र माध्यमिक, प्राथमिक व सर्व शाळा स्कूल, कोरोनातही ऑनलाईन पध्दतीने चालू ठेवून गुणवत्तेची परंपरा कोरोनाच्या जागतिक संकटातही कायम ठेवली आहे. स्वामी विवेकानंद सीबीएसई स्कुलची अदिवासी विद्यार्थ्यानी कु. राणी काळे ही (National pencak silat championship 2020) खेळासाठी जागतीक स्थरावर निवड झाली आहे. शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात जागतिक व देश पातळीवर काही विद्यार्थी गेले आहेत. सायन्य प्रदर्शनात महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ठ पारितोषिक मिळविणे आयआयटी, आयआयएम, नीट सारख्या विविध परीक्षा व इतर कामातून संस्थेने वेगळा ब्रॅन्ड निर्माण झाला आहे.