कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अजितसिंह पाटील कव्हेकरांचा विद्यार्थ्यांशी संवाद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अजितसिंह पाटील कव्हेकरांचा विद्यार्थ्यांशी संवाद

महाराष्ट्र विद्यालयाचा अभिनव उपक्रम : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित

लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक तथा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी “कारोणानंतरची शाळा” या उपक्रमांअतर्गत महाराष्ट्र विद्यालयातील 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट घेवून कोरोणाच्या पार्श्‍वभूमिवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला या संवादाअंती विद्यार्थ्यांची कोरोणा विषयीची भिती दूर झाली असली तरी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्क आणि सॅनिटायझर या साहित्याचा वापर विद्यार्थी काटेकोरपणे करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या या विधायक उपक्रमाचा आदर्श इतर संस्थासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कोरोणानंतरची शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळेतील वास्तव जाणून घेण्यासाठी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, पत्रकार वैजनाथराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी मनमुराद संवाद साधला. या संवादामध्ये कोरोणाची पार्श्‍वभूमी, कोरोणाशी लढा, विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास व विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परिक्षेतील गुणवत्ता यावर क्रियटिव्ह चर्चा झाली. यावेळी जेएसपीएम संस्थेचे समन्वयक सांचालक निळकंठराव पवार,महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे, कमलाकर कदम, बाळासाहेब जाधव, उमेश इरपे यांची उपस्थिती होती.या भेटी दरम्यान कोरोणाच्या पार्श्‍वभूमिवर 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य गोविंद शिंदे यांनी प्रश्‍न विचारून विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आवड संवादातून उलगडून घेतली. यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली.

About The Author

error: Content is protected !!