पोलिस शिपाई रियाज देखमुख व इतर दोघे अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

पोलिस शिपाई रियाज देखमुख व इतर दोघे अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

अहमदपुर (प्रतिनिधी) : अहमदपूर येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई रियाज फारुखमियाँ देखमुख यांनी खाजगी इसम असलम व वैभव बेल्लुरे यांच्या मार्फत 2 हजाराची लाच स्विकारल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील हामणे किराणा स्टोअर्स या दुकानात अवैधरित्या गुटखा विक्रीचा धंदा चालु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर कार्यवाही करीन असे सांगुन वैभव नावाचा इसमस भेटण्यास सांगितले. यानंतर गुटखा विक्री चालु ठेवण्यासाठी पोलिस शिपाई रियाज देशमुख यांना 3000 रूपये दे असे म्हणुन लाचेची मागणी करुन देण्यास सांगितले. अवैधरित्या गुटख्याचा धंदा चालु ठेवण्यासाठी व कार्यवाही न करणेसाठी मोबाईलवर टाईप करुन 5 हजार वरुन तडजोडीअंती 2 हजार रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम असलम यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. ठरल्याप्रमाणे असलम मौलीसाब तांबोळी यांनी पोलीस शिपाई रियाज देशमुख यांचे करीता दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी दु. 3.57 वाजता 2 हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष दस्तगीर गल्ली अहमदपुर येथील त्यांचे पान मटेरिअलच्या दुकानामध्ये स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर दिलेल्या फिर्यादीवरुन असलम, मौलीसाब तांबोळी, वैभव बेल्लुरे आणि पोलिस शिपाई रियाज देखमुख या तिघावर कलम 7, 7 अ, 12 ला.प्र.का. अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास लातुर लाचलुचपत प्रतिबंध विभाग लातुर येथील पोलीस निरिक्षक बाबासाहेब काकडे हे करीत आहेत.

सदरील कार्यवाही नांदेड विभागाचे अपर पोलिस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक बेद्रे, पो. नि. बी. एच. काकडे, कुमार दराडे, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह. रमाकांत चाटे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, पोना मोहन सुरवसे, मपोना शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, अमोल शिंदे, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोशि रुपाली भोसले, राजु महाजन आदींनी पार पाडली.

About The Author

error: Content is protected !!