श्रीमद् भागवत ग्रंथातून जीवनाला दिशा मिळते – ह.भ.प कृष्णा महाराज दस्तापूरकर
अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण वेदांचा सार व मृत्यूला मंगलमय बनणारा ग्रंथ तसेच मानवी जीवनासाठी कल्याणकारी आणि जीवनाला दिशा देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद् भागवत पुराण आहे, असे उद्गार ह.भ.प कृष्णा महाराज दस्तापूरकर यांनी काढले. तालुक्यातील हाळणी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तसेच कलशरोहन सोहळ्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, जि.प सदस्य माधवराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, प्रशांत भोसले, धनंजय जाधव, राम जायभाये, गोविंद काळे, भालचंद्र देशमुख, संतराम गुरूजी, सोनफफ्फागीरे, विठ्ठल देशमुख , प्रकाश देशमुख, किशन उमाटे,पुरोषत्तम चोपडे, सुर्यकांत चिगळे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर म्हणाले, की संसारातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भागवत ग्रंथात आहे. माणसाने मृत्यूला कसे मंगलमय बनवावे, हे त्यात सांगितले आहे . जीवनाचे परम सार्थक आणि असणारा भागवत दिशादर्शक महापुराण आहे . मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष आहे . आपण जगण्याचा अर्थ समजून घेतला तर जीवनात सुख माणसाला प्राप्त होऊ शकते. सर्व तीर्थक्षेत्र आई वडिलांच्या चरणांवर आहेत. आई – वडिलांची सेवा करा. तेच आपले दैवत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी तबला साथ संगित संयोजक भिमाशंकर महाराज पांचाळ अमडापुरकर संगीत साथ हार्मोनियम वादक गोपाळ महाराज नागरगोजे, यांच्यासह सहगायक डिंगांबर खिल्लारे हे होते. ह.भ.प कृष्णा महाराज दस्तापूरकर म्हणाले, जगात कोणीही सुखी नाही. माणूस पैशामुळे सुखी होतो, असे नाही. खरे सुख परमेश्वराच्या चिंतनात आहे. जो ईश्वराची आराधना करतो. त्याला कशाचीही कमी पडत नाही. परंतु माणूस भौतिक सुखाच्या पाठीमागे लागल्याने माणूस सौख्य गमावून बसला आहे.