भाजपा ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजक पदी जयश्री राठोड

भाजपा 'बेटी बचाव, बेटी पढाओ' अभियानाच्या जिल्हा संयोजक पदी जयश्री राठोड

महागाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तिवरंग येथील सरपंच तथा भाजप महिला जिल्हाउपाध्यक्षा सौ.जयश्री राठोड यांची बेटी बचाव, बेटी पढाओ या अभियानाच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी व मुलींचा जननदर वाढण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ योजना सुरू केली आहे.

तर याच अभियानाच्या सौ.जयश्री राठोड यांची मा.चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार तर बेटी बचाव, बेटी पढाओ अभियानाच्या प्रदेश संयोजक डॉ. शुभा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी निवड केली आहे.या निवडी बद्दल त्यांचे महिला वर्गातून अभिनंदन होत आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या धोरणामुळे राज्यात महीलांवरील अत्याचारांच्या घटनांना ऊत आलेला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याने महीलांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत. महीलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे अंमलात येऊ शकला नाही. राज्यातील आघाडी सरकार महीलांच्या सुरक्षिततेबाबत कमालीचे असंवेदनशील असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.सदा सर्वकाळ घडणारया बलात्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्यसरकारने कृती आराखडा जाहीर केला पाहिजे व यासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या अभियानाचा उपयोग करणार असल्याचे अभियान जिल्हा संयोजक सौ.जयश्री राठोड यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!