राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा सन्मान
किनगाव (गोविंद काळे) : भारत स्काऊट आणि गाईड या राज्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून दोन स्काऊट व दोन गाईडची यांची निवड करण्यात आली. त्यापैकी अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील श्री संत मोतीराम महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी स्वप्नील सोळंके व ज्ञानेश्वर मुरकुटे या दोघांची स्काऊट पुरस्कार तर जवाहर विद्यालय आशिव ,ता. औसा येथील सुहानी काकडे व साक्षी मदने यांची गाईड पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई चे सुनील केदार, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मंत्री क्रीडा व युवक कल्याण आदिती तटकरे ,राज्य मुख्य आयुक्त महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई व आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत स्काउट आणि गाईड राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.स्वप्नील सोळंके व ज्ञानेश्वर मुरकुटे या दोघांना स्काऊट तर साक्षी मदने व सुहानी काकडे याना गाईड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या बद्दल स्काऊटचे जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त युवराज माने, स्काऊट मास्तर संजीवकुमार देवनाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापारी जवाहर विद्यालयाचे संस्था सचिव शाहूराज माने, मुख्याध्यापक अशोक गायकवाड, श्री संत मोतीराम महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरहरी फड, मुख्याध्यापिका सागरताई घुले आदींनी अभिनंदन केले आहे.