तीस लक्ष रुपयांचा रस्ता न बनवता एमबी, व सिसी तयार

तीस लक्ष रुपयांचा रस्ता न बनवता एमबी, व सिसी तयार

जि.प.बांधकाम विभागातील प्रभारी उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांचा प्रताप

महागाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येणारा रस्ता न बनवताच एम बी व सिसी बनवुन तीस लाख रुपयांचा निधी लाटण्याचा प्रयत्न कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या सतर्कतेने हाणून पाडला आहे. रस्ते विकासाचे मुख्य साधन असुन खेड्यापाड्यातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेशी जोडण्यात येवुन त्यांच्या विकासाचा राजमार्ग सोपा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहेत परंतु काही भ्रष्ट अधिकारी या निधीवर डोळा ठेवुन शासनाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासत असल्याचा प्रकार महागाव तालुक्यात घडला आहे हिवरा(संगम) जिल्हा परिषद गटातील टेंभी ते हिवरा रस्त्यावरून कवठा गावाकडे जाणाऱ्या जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे अंदाजे एक किलोमीटर डांबरीकरणाचे काम ३०-५४योजनेमधुन मंजुर करण्यात आले या कामाकरिता ३०लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला याच निधीवर डोळा ठेवुन महागाव येथील जि.प.बांधकामाचे तत्कालीन प्रभारी उपअभियंता एम.एच कुमठे यांनी कनिष्ठ महिला अभियंता व कंत्राटदाराला हाताशी धरून सदर काम न करताच या कामाची एम बी(मोजमाप पुस्तिका) व सिसी(काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बनवुन बिले काढण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ येथे पाठविले परन्तु तेथील यावले नामक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी सदर न झालेल्या कामाचे बिले काढण्यास नकार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला असुन प्रभारी अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या कार्यकाळात झालेल्या तालुक्यातील अनेक विकासकामांबाबत साशंकता निर्माण होत आहे.त्यामुळे शासन सेवेत राहून शासनाची फसवणुक करणाऱ्या कुमठे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व त्याला साथ देणाऱ्या कनिष्ठ महिला अभियंता व कंत्राटदारावर कारवाई केल्या जाणार की त्यांची पाठराखण करून त्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घातल्या जाईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चौकट
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने ३०-५४या लेखशीर्षा खाली कवठा ते हिवरदरी असा अंदाजे दोन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ३०लक्ष रुपये मंजुर करण्यात आले परंतु काम पुर्ण न करताच मार्च महिन्यात एम बी व सिसि बनविण्यात आली असताना त्या ठिकाणी आता काही साहित्य येवुन पडले त्यामुळे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून शासनाची लुट करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा या गैरव्यवहाराविरोधात विधिमंडळात आवाज उठविल्या जाईल – आ.नामदेवराव ससाणे.

चौकट

काम पुर्ण न होताच एमबी व सिसी कशी काय बनविली जावु शकते?यावरून प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे अशा भ्रष्ट कारभाराला पाठबळ असुन त्यांच्याच जोरावर उपअभियंता व कनिष्ठ अभियंता बोगस कामे करून शासनाची फसवणुक करीत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील सर्व विकास कामांची चौकशी होणे आवश्यक असुन तत्कालीन उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे – विलास भुसारे(माजी जि.प.सदस्य यवतमाळ)

चौकट

कामे न करताच एमबी व सिसी बनविण्याचा प्रकार गंभीर असुन या प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केल्या जाईल – दिलीप कुठे (कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळ)

About The Author