केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये

केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या कोट्यावधीच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करून सर्वसामान्यांना किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्याचे धोरण राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री महादयांनी नुकतेच जाहीर केले आहे. परंतु या हॉस्पिटलचे खाजगीकरण केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी त्यांची लूटच मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे पीपीपीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवांना बळकटीकरण करण्याचे कारण पुढे करून केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या राज्यातील तीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाजगीरणाची निविदा तत्काळ रद्द करून सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय द्यावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.

नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,औरंगाबाद व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर येथील अतिविशेषोउपचार रूग्णालयाची देखभाल व व्यवस्थापक करण्याचे काम पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर सुरु करण्याचा घाट राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घातलेला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषण द्रव्य विभाग आणि इंटरनॅशनल फायणांन्स कार्पोरशन यांच्या सयुंक्‍त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण व तृतीय आरोग्य सेवचे सार्वजनिक खाजगी भागिदीरीच्या माध्यमातून बळकटीकरण करण्यासाठी आयोजित गुंतवणूकदाराच्या मुंबईतील परीषदेत त्यांनी जाहीर केले. परंतु या माध्यमातून केलेल्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची लूट मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ही सुपरस्पेशालीटीच्या खाजगीकणाची निविदा तत्काळ रद्द करून सर्वसामान्य नागरिक व रूग्णांना न्याय द्यावी, अशी मागणी केंद्रिय आरोग्य मंत्री ना. मनसुख मांडवीय, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी कळविले आहे.

About The Author