लातुरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा
लातूर (प्रतिनिधी) : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी हर्षोल्हासात साजरा केला जाणार आहे. या बसव जन्मोत्सव सोहळ्याचा उद्घाटन समारंभ मंगळवार,दि. ०३ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा बसवेश्वर महाराज चौक, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे,खा. सुधाकर शृंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. धीरज देशमुख, आ. अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील, आ. रमेशप्पा कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समिती सभापती दीपक मठपती, नगरसेवक सर्वश्री दीपक सूळ, शैलेश स्वामी, पूजा पंचाक्षरी, संगीत रंदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे , शैलेश लाहोटी, मकरंद सावे, एड. किरण जाधव, मोईज शेख, शिवाजीराव माने, मुस्तफा घंटे यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
बसव जन्मोत्सवाचे औचित्य साधून रविवार, दि. ०१ मे रोजी सकाळची ९ ते सायं. ५ या वेळेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. सोमवार, दि. ०२ मे रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत महात्मा बसवेश्वर सभागृहात सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रात्री १२ वाजता नामफलकाचे उद्घाटन होणार आहे. मंगळवार, दि. ०३ मे रोजी सकाळी ९ वाजता कव्हा नाका येथील बसवेश्वर चौकात झेंडावंदन व पूजन होईल. सकाळी १० वाजता महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या मैदानात पोट्रेट चे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल. दुपारी १२ भव्य मोटरसायकल रॅली, दुपारी साडेबारा वाजता आझाद चौकातील पाचशे घर मठात जन्मोत्सव पालन व सायं . साडेपाच वाजता आझाद चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. जन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मनोज पाटील रायवाडीकर , कार्याध्यक्ष योगेश गिरवलकर, सचिव बालाजी झिपरे, स्वागताध्यक्ष इंजिनिअर राजकुमार नाईकवाडे, महिला अध्यक्षा सौ. भाग्यश्री कौळखेरे , कार्याध्यक्षा स्मिता खानापुरे, मुख्य संयोजक सौ. लताताई मुद्दे यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे