श्री सिद्धीविनायक मंदीर, शाम नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेस प्रारंभ

श्री सिद्धीविनायक मंदीर, शाम नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेस प्रारंभ

लातूर (प्रतिनिधी) : शहरातील शाम नगर येथील श्री सिद्धीविनायक मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेस बुधवार दि. 27 एप्रिल 2022 पासून प्रारंभ झाला आहे. दि. 27 एप्रिल पासुन 4 मार्च पर्यंत या सात दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये दररोज पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 3 ते 6 भागवतकार ह.भ.प.मारुती महाराज हरंगुळकर यांची भागवत कथा होणार असून दररोज सायंकाळी 8 ते 11 या वेळेत ह. भ. प. महेश महाराज भांदर्गे, ह. भ. प. गोपीचंद महाराज सारसेकर, ह. भ. प. सखाराम महाराज सेलुकर, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर, ह. भ. प. बालाजी महाराज मेटे, ह. भ. प. सुधीर महाराज होळीकर, ह.भ.प.सुधाकर महाराज काळे सलगरा यांचे किर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ ध्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री नामदेव पडीले, सचिव भागवत भदे, कोषाध्यक्ष चंद्रकांत झुंजारे, मुख्य संयोजक सुनिल पडीले, सदस्य, डॉ. चंद्रकांत जोशी, आत्माराम तट, प्रल्हाद देशपांडे, बाबुराव शिंदे, डॉ. दिलीप देशपांडे, आशिष पडीले, दत्ता कुलकर्णी, बाबुराव सोमवंशी, राजकुमार कुलकर्णी, विश्वनाथ्ज्ञ पांढरे, बालाजी पडीले, अयकुमार यादव, संजय मलवाडे, अजय वागदरे, आदींनी केले आहे.

About The Author