वैचारीक प्रबोधन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मूळ गाभा – डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : हल्ली जयंती ला दिवसेंदिवस उत्सवाचे स्वरूप येवू पहात आहे जयंतीच्या माध्यमातून समाजात वैचारिक बैठक तयार व्हावी तसेच आंबेडकरी समुदाया समोरील ज्वलंत आव्हानांची चर्चा होणे गरजेचे आहे किंबहूना वैचारिक प्रबोधन हाच आंबेडकर जयंतीचा मूळ गाभा आहे परंतू या मूळ उद्देशापासून आपण दूर जातोय की काय असा प्रश्न समोर येत असून आंबेडकरी समाजाने वेळीच सावध होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. मौजे खंडाळी ता. अहमदपूर येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी खंडाळी सरपंच बबीता मोरे या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून उपसरपंच गिरीष पोळ,बौध्द महासभेचे तालूकाध्यक्ष एम. एन. क्षिरसागर, ग्रा.पं.सदस्य प्रशांत शिंदे, पोलीस पाटील मच्छींद्र भारती, पत्रकार अजय भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वाचा अभ्यासासाठी त्यांची अनूक अदृश्य पैलू समाजापूढे मांडणे गरजेचे आहे यातून बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण लक्षात येईल.व्यसनमूक्तीच्या दिशेने युवकांनी वाटचाल करावी.जयंतीत मस्ती असावी मात्र त्याची शिस्त कोन्ही सोडता कामानये.वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी पूढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सूरूवातीला माजी सभापती आयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी सामूहिक त्रीशरण व पंचशिल घेण्यात आले.या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बालाजी आचार्य यांनीही आपले समायोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार सोनकांबळे, सचिव शरद सोनकांबळे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, कोषाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, भैय्यासाहेब कांबळे, सौरभ लामतुरे, गोरखनाथ सोनकांबळे, मनोज कांबळे, रूपेश कसबे, वैभव सोनकांबळे आदीनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड आर. एम. सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक नितीन कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद सोनकांबळे यांनी मानले. या वेळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.
