ग्रामीण भागातील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार – गणेश दादा हाके पाटील

ग्रामीण भागातील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार - गणेश दादा हाके पाटील

सम्राट चंद्रगुप्त मौर्य शाळेत पालक मेळावा संपन्न

अहमदपुर (गोविंद काळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठीच गणेश शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापणा केली असुन ग्रामीण भागातील विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष तथा भाजपा नेते गणेश दादा हाके पाटील यांनी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कुल रुद्धा ता अहमदपूर च्या वतिने आयोजित पालक मेळाव्यात केले. व्यासपिठावर संस्थासचिव तथा माजी जि.प.सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे, संचालक कुलदिप हाके, शिवलीका हाके, भाजपा तालुकाध्यक्ष हनमंतराव देवकत्ते आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती च्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थांनी विविध प्रकारचे प्रयोग, नृत्यकला सादर केल्या. यावेळी यशस्वी विद्यार्थांचा पालका समावेत सत्कार करण्यात आला. सहशिक्षक शुभम पोले याच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांनी रॉकेट प्रदर्शन सादर केले. या कार्यक्रमासाठी तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, आयटीआयचे प्राचार्य मदन आरदवाड , सतीश केंद्रे सह पालक, विद्यार्थी, कर्मचारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशिस्वेतेसाठी संचालक कुलदीप हाके संचालिका शिवालीका हाके, शुभांगी सूर्यवंशी मलकानी निजमुद्दिन , भरत कानवटे, शुभम पोले यांनी परिश्रम घेतले. सुत्रचंलन प्राचार्य ऋत चक्रनारायण यांनी तर आभार कुलदीप हाके यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!