महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता याबरोबरच राष्ट्र उद्धाराचे कार्य केले; ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी व सूत्रसंचालन डॉ. सतीश ससाणे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने होते.

About The Author

error: Content is protected !!