पालकमंत्री अमित देशमुख यांनी एस.एच.कोचेटा अँड असोसिएटस कार्यालयाची केली पाहणी

पालकमंत्री अमित देशमुख यांनी एस.एच.कोचेटा अँड असोसिएटस कार्यालयाची केली पाहणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील रामनगर येथे वर्धमान चेंबर्समध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या एस. एच. कोचेटा अँड असोसिएट्स या अद्ययावत कार्यालयास भेट देऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुनील कोचेटा आणि त्याच बरोबर प्रथमेश व हितेश कोचेटा यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या व्यवसायातून लातूरच्या विकास प्रक्रियेला गती देण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील औसा रोड, राम नगर येथील वर्धमान चेंबर्स मधील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ञ संचालक तथा लातूर शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट सुनिल हुकुमचंद कोचेटा यांच्या एस.एच कोचेटा अँड असोसिएट्स यांच्या कार्यालयास भेट देऊन पाहणीकरून माहिती जाणून घेऊन कोचेटा कुटुंबीयांना पुढील व्यवसायाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील आमदार अभिमन्यू पवार, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहा पौर चंद्रकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.
यावेळी सुनिल कोचेटा प्रथमेश सुनील कोचेटा, हितेश सुनील कोचेटा, कोचेटा कुटूंबीय मित्र परिवार आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी रोटरी क्लब, उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक पत्रकार प्रतिष्ठित व्यावसायिक, व्यापारी नागरिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!