समता, बंधुता विवेकाचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी

समता, बंधुता विवेकाचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी

लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगाला बंधुता, समता आणि संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची जयंती आज दयानंद कला महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

महात्मा बसवेश्वरांनी स्त्री स्वातंत्र्याला महत्व दिल्याने याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवाजी गायकवाड यांनी भूगोल विभागातील प्रा. डॉ. आश्लेषा कोंडापूरे यांना प्रमूख वक्त्या म्हणून पाचारण केले. यावेळी प्रा. डॉ. आश्लेषा कोंडापूरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जातीयता अंधश्रद्धा, कर्मकांड यांचे स्तोम असताना 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी बंधुता, समता आणि विवेकाचा मंत्र जगाला दिला. ख-या अर्थाने सामाजिक समता, प्रस्थापीत करण्याचे कार्य त्यांनी केले. काय कवे कैलास म्हणजे प्रत्येकाने कामालाच देव मानून आपले कार्य करत राहावे असा विचार मांडला. त्यांनी जीवनात कर्मकांडाला थारा दिला नाही. स्त्री स्वतंत्र्यास महत्व दिले. जगातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणला आणि अनूभव मंडपाच्या माध्यमातून जगातील पहिली लोकसंसद स्थापन केली, असे विचार मांडले.

यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, प्रा डॉ अंकुशकुमार चव्हाण, डॉ. सुनीता सांगोले, डॉ शैलजा दामरे, प्रा. दशरथ ननवरे, प्रा. रविकिरण गळगे,प्रा. सुधीर गाडवे, प्रा. शैलेश सुर्यवंशी, सौ. तोंडारे शिवनंदा, श्री. श्रीकांत जोशी, रामकिशन शिंदे, सचिन वांगसकर, रवी सुर्यवंशी आदी कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!