आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन

आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषद केंद्रीय विद्यालय प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना आमदार यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपली महाराष्ट्र ही भूमी छत्रपतींची, साधूसंतांची, शक्तिची, भक्तीची आहे. महाराष्ट्राच्या मातीने देशाला अनेकदा दिशा दाखवली आहे. आज महाराष्ट्राच्या ६२ व्या स्थापना दिनानिमित्त, संयुक्त महाराष्ट्राच्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतो असे उद्गार ध्वजारोहन प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी काढले

प्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रवीणजी फुलारी , तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, युवा नेते सुरजभैय्या पाटील, सभापती शिवानंद हेंगणे, ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि प सदस्य माधवराव जाधव, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, उपसभापती तुकाराम पाटील, भाऊसाहेब शेळके, माजी उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, तानाजी राजे, दयानंद पाटील, अभय मिरकले, भैय्या भाई सय्यद, अनिस कुरेशी, नागेश महाजन, फेरोज शेख, नबी सय्यद, दस्तगिरभाई शेख, जावेद बागवान, गोपिनाथ जोंधळे, नागेश महाजन, अशोक सोनकांबळे, संग्राम गायकवाड, गोलंदाज, जीलानी शेख, तलाठी वर्ग महसूल अधिकारी शिक्षक आदी व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!