सेवानिवृत्त सैनिकाचा गावकऱ्यांनी केला गौरव

सेवानिवृत्त सैनिकाचा गावकऱ्यांनी केला गौरव

निलंगा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नणंद येथील श्री गणेश नारायण लादे हे दि. 30 एप्रिल रोजी भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी नणंद या ठिकाणी १ मे आले. निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकतील भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निलंगा तालुक्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नणंद येथे ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व त्यांचे सहकारी यांनी सुद्धा गणेश लादे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गावांमध्ये त्यांची भव्य अशी सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मारुती मंदिरात गावचे सरपंच हरिदास बाेळे, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, पाणी फाउंडेशन, घाडगे मित्र मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी गावाला सणाचे स्वरूप आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व गावकरी आवर्जून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!