शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या हस्ते ‘स्वरगंध’ अँपचे उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक तथा राज्यमंडळ सदस्य डॉ.संदीपान जगदाळे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया मनोरंजक व आनंददायी व्हावी यासाठी ‘स्वरगंध’ या मोबाईल अँपची निर्मिती केली आहे.या अँपचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.पुणे येथील शिक्षण संचालनालय कार्यालय,सेंट्रल बिल्डिंग येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीच्या बैठकीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र व गोवा क्षेत्रीय कार्यालय संचालक डॉ. कार्तिकेयन,राज्य समन्वयक श्री अजय शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्र अहमदनगरचे संचालक डॉ.बोरुडे,सहाय्यक शिक्षण संचालक तथा रासेयो राज्य समन्वयक श्री प्रसाद कालगावकर, महाराष्ट्रातील शिक्षण विभागातील विभागीय सहायक, शिक्षण संचालक व राज्यभरातील अधिक दोन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक उपस्थित होते.
डॉ. जगदाळे यांनी या अँपमध्ये ‘भारतीय संगीताचा इतिहास व विकास’ व ‘तालवाद्य’ या विषयांच्या इयत्ता ११ वी व १२ वीच्या पाठ्यक्रमावर आधारित व्हिडिओ समाविष्ट केले आहेत.या अँपद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येणार आहेत.संगीत विषयाच्या नोट्स, पाठ्यपुस्तक यासोबतच हसत खेळत अभ्यास कसा करावा?तबलवादन कसे करावे? करिअर समुपदेशन याविषयांची माहिती मिळणार आहे.
लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता व्हावी व योगविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी योग विषयक व्हिडीओ यात प्रेषित केले आहेत. या ऑपमध्ये ९४ व्हिडिओंचा समावेश आहे. इयत्ता ११ वी व १२ वीच्या संगीत विषयाच्या विद्यार्थ्यांना तर याचा लाभ होणारच आहे शिवाय संगीत विषयाचे अध्ययन करणाऱ्या गांधर्व मंडळाच्या अभ्यासकांना व रसिक श्रोत्यांना याचा लाभ होणार आहे. हे अँप अँड्रॉइड मोबाईल मध्ये उपलब्ध असून गूगल प्ले स्टोअर वरून मोफत डाऊलोड करता येणार आहे.याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले आहे.
या स्तुत्य शैक्षणिक उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष ललितभाई शहा, रमेश राठी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, विभागीय मंडळ अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या तंत्रस्नेही उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ.देवेंद्र कुलकर्णी, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.
