बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन व आय टी आय व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने राष्ट्रसंत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याला उजाळा देताना कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातीलजातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी “अनुभव मंडप’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता असे मत कुलदीप हाके यांनी मांडले. यावेळी संतोष होनमाणे, भरत दुधाटे, रवी नरवटे,सतीश केंद्रे आदी उपस्थित राहून अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!