जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर

जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर

भिवा बिडगर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : शहरातील व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भिवा बिडगर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेढा भरून सत्कार करण्यात आला. तसेच केक कापुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला. जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी कठिबध्द असता, जनतेच्या सुखःदुःखात धावुन जातात, जन सामान्यांसाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजेच भिवा बिडगर असे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

ग्रामीण भागातील सर्व परिचित असणारे बहुअयामी व्यक्तीमत्व, गरीब लोकांच्या वेळेला उभा रहाणे आणि त्यातूनच आपलं समाजकारण, करणारे दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे तालुक्यातील दाऊतपूर येथील भिवा बिडगर यांच्या वाढदिवसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान मित्र परिवाराच्या वतीने र्हदय सत्कार करण्यात आला. जीवनात प्रगतीची नवी आशा, नवा उत्साह निर्माण करणाऱ्या निस्वार्थी, कायम जनतेच्या हिताला प्राधान्य देत जनसेवेचा वारसा असलेले सदैव हसतमुख व्यक्तिमत्व भिवा बिडगर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी सतिश मुंडे, माऊली तात्या गडदे, विकास बिडगर, सुनील कोटेचा, प्रकाश ससाणे, कमलाकर बिडगर, गोविंद सोनवणे, गोविंद मोहेकर, विश्वनाथ देवकते, दिपक कातकडे, चंद्रकांत देवकते, भास्कर नाईकवाडे, सुधाकर नाईकवाडे, व्यंकट बिडगर, रफीक भाई, अनिस शेख,सिदराम बंडेवार, समी भाई, व्हीवल मिश्रा, सुधाकर बडे, संभाजी नागरगोजे, अविनाश नागरगोजे, शफी भाई श्रीनिवास राऊत, उमेश राऊत , महादेव गित्ते, यांच्या सह इतर मित्र उपस्थित होते.

विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्‌सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे त्यांनी आभार मानले असुन या शुभेच्छांच्या बळावर आपण आणखी उमेदिने सामाजिक/शैक्षणिक, धार्मिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवाच्या निमित्त सत्कार प्रसंगी श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यत मित्रांचा रुणी राहील व मिञांनी दिलेल्या शुभेच्छा कदापिही विसरणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.

About The Author