मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा रविवारी भव्य शुभारंभ

मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा रविवारी भव्य शुभारंभ

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-जानिमियाँ कुरेशी

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते सिरसाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले आहे.

सिरसाळा येथे बी.एस.एन.एल टाँवरच्या बाजूला इदगाह चौकात रविवार दि.08 मे रोजी सकाळी 11.30 वाजता न्यू अपेक्स हाँस्पीटल व जे.के.मेडिकलचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते भव्य शुभारंभ संपन्न होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य आ.संजय दौंड हे राहणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मिक आण्णा कराड, जि.प.गटनेते अजय मुंडे, जि.प.अध्यक्षा सौ शिवकन्याताई शिवाजी सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, जि.प.सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी ऊर्फ पिंटू मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.टी.नाना देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुर्यभान नाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, जि.प.सदस्य बालासाहेब किरवले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, सुंदररराव सहकारी साखर कारखाना तेलगाव संचालक प्रभाकर पौळ, तपोवन मा.सरपंच चंद्रकांत कराड, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, उपसरपंच इम्रानखाँ पठाण, माजी सरपंच आक्रमखाँ पठाण, माजी सरपंच वैजनाथराव देशमुख,बीड जिल्हा रूग्णालय भुलतज्ञ एम.बी.बी.एस.डी.ए. डॉ.सय्यद अब्दुल शाफे, सिरसाळा वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ मुंडे, सिरसाळा हाजी शेख मैनुभाई , सिरसाळा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. भिमराव साळवे, सिरसाळा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जनकराव कदम उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी तसेच निमंत्रण पत्रिका नजर चुकीने राहिल्यास हेच अग्राहाचे निमंत्रण समजून उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी, एम.बी.बी.एस.एमडी डॉ. शेख रेहान, सी.सी.वाय.एन.डॉ. सय्यद इरफान, फय्याज जानिमियाँ कुरेशी, जे.के.मेडिकल संचालक सिराज जानिमियाँ कुरेशी (9422240424) यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!