केंद्रेवाडीच्या निवडणूकीत जय जवान जय किसान पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

केंद्रेवाडीच्या निवडणूकीत जय जवान जय किसान पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटी या निवडणुकीत जि प सदस्य श्री अशोका काका केंद्रे व सभापती सौ अयोध्याताई अशोकराव केंद्रे नेतृत्वात जय जवान जय किसान पॅनलने ही निवडणूक लढली होती या निवडणुकीत त्यांनी गावात केलेल्या विकास कामाचा धागा पकडत गावातील गावकऱ्यांनी त्यांना खंबीर साथ दिली त्यांच्या नेतृत्वात 11 पैकी 11 जागा निर्विवाद बहुमताने विजयी झाल्या आहेत याचे श्रेय श्री अशोक काका केंद्रे यांना जाते विजयी उमेदवारामध्ये यात स्वतः अशोक निवृत्तीराव केंद्रे, माणिक पाटलोबा केंद्रे, देविदास रामा केंद्रे, वाल्मीक श्रीपती केंद्रे, बाबू पंढरी केंद्रे, वामन एकनाथ केंद्रे, विश्वास श्रीरंगराव केंद्रे, दिगंबर पंढरी केंद्रे, महिला उमेदवारांमध्ये सौ. सगुणा श्रीराम केंद्रे, सौ. सुनिता विठ्ठल केंद्रे, भटक्या जमाती मधून चंद्रकांत गणपतराव केंद्रे, असे अकरा उमेदवार निवडून आले आहेत एस सी प्रवर्गातून धोंडीराम सोपान गायकवाड यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली होती असा या बारा उमेदवारांचे पूर्ण गावाकडून अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!