तर मी अराईज अकॅडमीला प्रवेश घेवून डॉक्टर्स, इंजिनियर्सची स्वप्नपूर्ती करेन – सिने अभिनेते भाऊ कदम

तर मी अराईज अकॅडमीला प्रवेश घेवून डॉक्टर्स, इंजिनियर्सची स्वप्नपूर्ती करेन - सिने अभिनेते भाऊ कदम

लातूर (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन जिवनामध्ये घरची परिस्थिती प्रतिकूल होतील तूमच्यासारखं मोफत शिक्षण घेण्याची सोय नव्हती नसता मी सुध्दा डॉक्टर, इंजिनियर झालो असतो परंतु मित्रहो तूमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेले आहात. त्यामुळे तुम्हाला अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत आहे. मला जर पूनर्जन्म मिळाला तर मी लातूरच्या माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांच्या अराईज अकॅडमीलाच प्रवेश घेईन आणि डॉक्टर्स, इंजिनियरर्स करण्याची स्वप्नपूर्ती करेन, असे प्रतिपादन चला हवा येऊ द्या फेम प्रसिध्द सिनेअभिनेते भाऊ कदम यांनी केले.

यावेळी ते जेएसपीएम संचलित अराईज अकॅडमीच्यावतीने एक संकल्प एक गाव एक विद्यार्थी या शैक्षणिक उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, चित्रपट निर्माते संतोषराव साखरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, काजलताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वय निळकंठराव पवार, अराईज अकॅडमीचे संचालक संभाजीराव पाटील रावणगांवकर, विश्‍वजीत पाटील कव्हेकर,समन्वयक बापूसाहेब गोरे, प्रा.आर.के मिश्रा, प्रा.डी.के.सर, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य मनोज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भाऊ कदम म्हणाले की, चित्रपट व नाट्य क्षेत्रासाठी लातूर शहर हे केंद्रबींदू ठरलेले आहे. त्यामुळे नाट्य व चित्रपट क्षेत्रात करीअर करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दिल्‍ली येथे पाच वर्षाचा कोर्स आहे. तेथे प्रवेश निश्‍चित करावा परंतु नुसते यायचं म्हणून न येता या क्षेत्रात करीअर करायचे असेल तरच या असा प्रेमाचा सल्‍लाही त्यांनी दिला. अनेक चित्रपट व नाट्य क्षेत्रातून चला हवा येऊ द्या मधून शांताबाईच्या चालीच्या रोलला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शांत राहणे माझ्या स्वभावात नव्हते. मी गोंधळ करणारा विद्यार्थी परंतु घरची परिस्थिती लक्षात घेवून अनेक चित्रपट व नाट्यक्षेत्रातील मान्यवरांच्या सहवासातून कठोर परिश्रमाची जोड देवून या क्षेत्राकडे वळलो. सध्या राजकारणामध्येही भोंग्याचा विषय चर्चेला येत आहे. याबाबत बोलताना म्हणाले. भोंगा किंवा हनुमान चालिसा यापेक्षा हास्याचा भोंगा केव्हावी गे्रटच आहे. त्यामुळे त्या राजकारणात न पडता प्रेक्षकांनी हास्याच्या भोंग्याकडे वळावे. मी घरच्या परिस्थितीमुळे या क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होेतो. परंतु माझ्यावरील सिने अभिनेते दादा कोंडके यांचा प्रभाव व माझे गुरू विजय निकम यांनी मला माझ्यातील कला पाहून मला या क्षेत्राकडे परत आणलं व पांडूमधील गुलाबजाम व मिसळ खावून मी हास्य सम्राट झालो असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तर मी अराईज अकॅडमीला प्रवेश घेवून डॉक्टर्स, इंजिनियर्सची स्वप्नपूर्ती करेन - सिने अभिनेते भाऊ कदम

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्याहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपजप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी नीटमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच एक संकल्प एक गाव एक विद्यार्थी या मोफत शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रातिनिधीक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देवून या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नवीन सीबीएसई पध्दतीमुळे भारत जगाचे नेतृत्व करेल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
जेएसपीएम लातूर व अराईज अकॅडमी यांच्या संयुक्‍त विद्यमाने “एक संकल्प, एक गाव, एक विद्यार्थी ” या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच सिनेअभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे आता सर्वजन भाऊ कदम यांचे प्रेरणादायी विचार ऐकून हास्याचा आंनद घेणार आहेत. गेल्या 38 वर्षापासून 30 युनिटच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षण देण्याचे काम लातूर उस्मानाबाद नांदेड, पुणे, औरंगाबाद या शहरात उभारण्यात आलेल्या युनिटच्या माध्यमातून केले जात आहे. सत्य, सदाचार हाच धर्म आणि गुणवत्ता व टॅलेंट हीच आमची जात समजून संस्थेची वाटचाल सुरु आहे. तब्बल 34 वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीसीएस शिक्षण पध्दती आणलेली आहे. या नवीन शिक्षणपध्दतीमुळे अध्यात्म विज्ञान व व्यावसायीकतेला प्राधान्य दिले असल्यामुळे या शिक्षणपध्दतीमुळे भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन भाजपा नेते, किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

भाऊ कदम यांचा व्हिडीओ पाहिला की आजार दूर होतो – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर ही शिक्षणाची राजधानी आहे. त्यामुळे पुण्यानंतर लातूरात दर्जेदार शिक्षण देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून होत आलेले आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत अराईज अकॅडमीचे सर्वेसर्वा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, अजितसिंह पाटील कव्हेकर, रणतिसिंह पाटील कव्हेकर व संभाजीराव पाटील रावणगावकर यांनी अराईज अकॅडमीच्या माध्यमातून नीट व जेईईचे शिक्षण देण्याचे काम सुुरु ठेवलेली आहे. एक रूपयात शिक्षण देण्याचे काम सुरु करून दीड हजार गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना डॉक्टर्स इंजियिरींगच्या प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. आताही “एक संकल्प, एक गाव, एक विद्यार्थी ” या माध्यमातून प्रत्येक गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नीट व जेईईचे शिक्षण मोफत देण्याच्या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन सिनेअभिनेते डॉ.भाऊ कदम यांच्याहस्ते करण्यात आलेले आहे. डॉक्टर असा प्रयोग मी या अर्थाने केला की आजार झाला की आपण डॉक्टरांकडून उपचार घेतो आणि आजार बरा होतो, तोच प्रयोग डॉ.भाऊ कदम यांच्या बाबतही लागू हेातो. त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहिला की आजार बरा होतो. त्यामुळे आता भाऊ कदम यांना डॉ.भाऊ कदमच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन माजी कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

भाषणातून प्रेरणा घेवून डॉक्टर्स इंजिनियर व्हाल ही अपेक्षा – अजितसिंह पाटील कव्हेकर
भाषणातून सर्वसामान्यांचे मनोरंजन करण्याचे काम सिने अभिनेते भाऊ कदम करतात. त्यांच्याविना झी मराठीचा सोहळाही फिका होतो. त्यामुळे अराईज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगूणीत करण्यासाठी त्यांना आपण बोलाविलेले आहे व त्यांच्याहस्ते “एक संकल्प, एक गाव, एक विद्यार्थी ” या उपक्रमाचे उद्घाटनही आपण केलेले आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही डॉक्टर्स, इंजिनियर्स होता यावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात होणार्‍या भाषणातून प्रेरणा घेवून आपण डॉक्टर इंजिनियर्स व्हाल अशी अपेक्षाही भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक तथा जेएसपीएम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

About The Author