लातुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण व शहर बैठकीचे आयोजन

लातुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण व शहर बैठकीचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण व शहर बैठकीचे आयोजन दिनांक १२ मे २०२२ रोजी ठीक १.३० वाजता अतिथी हॉटेल कॉकसीट कोलेज समोर लातूर येथे केले आहे. या बैठकीला माजी खासदार जनार्धनजी वाघमारे, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, आमदार विक्रमजी काळे, प्रदेश सरचिटणीस बस्वराजजी पाटील नागराळकर,युवक प्रदेश कार्यध्यक्ष सुरजजी चव्हाण,लातूर जिल्हा निरीक्षक वसंतराव सुगावे, शहराध्यक्ष मकरंदजी सावे, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अफसरबाबा शेख, शहर कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व सेल जिल्हाध्यक्ष ,सर्व सेल जिल्हा कार्यकारणी, सर्व सेल तालुकाध्यक्ष, सर्व सेल शहराध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्वांनी उपस्थित रहावे, अशी विनंती आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी लातुर बाबासाहेब पाटील.यांनी केली आहे.

About The Author