सुप्त कलागुणांना वाव व सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण – डॉ.धनाजी कुमठेकर

सुप्त कलागुणांना वाव व सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण - डॉ.धनाजी कुमठेकर

उदगीर : उदगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये सृजनशील उपक्रमाचे उन्हाळी शिबिर उद्घाटन सोहळा दिनांक 11 मे 2022 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उदगीर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर धनाजी कुमठेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सृजनशील उपक्रमाचे उन्हाळी शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या कलागुणांना वाव द्यावा भविष्यातील मोठे कलावंत होण्याची हीच मोठी संधी आहे त्याचा पाया अशा शिबिरातून घातला जातो.सुप्त कलागुणांना वाव व सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण आहे असे मनोगत डॉक्टर धनाजी कुमठेकर यांनी व्यक्त केले व सृजनशील उपक्रमाच्या उन्हाळी शिबिरास सर्व विद्यार्थ्यांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर होते त्यांनी आपल्या मनोगतामध्ये असे मत व्यक्त केले की अशा प्रकारची शिबिरे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी मोठी मेजवानी ठरतात. हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठी अशी शिबिर खूप मोठी भूमिका बजावतात.मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना सृजनशील उपक्रमातून प्राप्त होते.श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍडवोकेट सुपोषणपाणि आर्य सर यांच्या संकल्पनेतून अशा विविध विद्यार्थीप्रिय उपक्रमाचे आयोजन केले आहे याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होत आहे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या शिबिरामध्ये आहे.या शिबिराच्या माध्यमातून हसत खेळत योगा, व्यायाम, प्राणायाम, चित्रकला, नृत्य, गायन, वादन, शिल्पकाम, कागदकाम, टाकाऊ पासून टिकाऊ, फन विथ इंग्लिश,विज्ञान चमत्कार, स्ट्रिंग आर्ट अशा विविध विद्यार्थीप्रिय उपक्रमाचे आयोजन या शिबिरामध्ये केले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा व आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले प्रास्ताविक रोडगे शैलजा यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य भोळे प्रवीण यांनी केले. सृजनशील उपक्रमाचे उन्हाळी शिबिर उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला

About The Author