आ.जिग्नेशभाई मेवानी त्यांना पुन्हा त्रास दिल्यास देशभर आंदोलन – निवृत्ती सांगवे सोनकांबळे

आ.जिग्नेशभाई मेवानी त्यांना पुन्हा त्रास दिल्यास देशभर आंदोलन - निवृत्ती सांगवे सोनकांबळे

उदगीर (प्रतिनिधी) : दिन, दलितांचे कैवारी, गोरगरीब, उपेक्षितांचे प्रश्न मिटवणारे लोकप्रतिनिधी, आमदार जिग्नेश भाई मेवाणी यांच्या आक्रमक भूमिकेला घाबरून केंद्र सरकारने चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या गुन्ह्याखाली जिग्नेश भाईंना अटक करून दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही संपूर्ण दलित, उपेक्षित, शोषित, मागास, आदिवासी सर्व समाज आमदार जिग्नेश भाईंच्या पाठीशी असल्याने नाईलाजाने गुजरात सरकारने नमते धोरण घेत त्यांना जामीन दिला आहे.
गुजरात राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना अत्यंत जिद्दीने आणि गोरगरिबांसाठी लढणारा नेता म्हणून जिग्नेश भाई प्रचंड बहुमताने विजयी होतात! हा त्यांचा इतिहास भारताला माहिती आहे !! त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणावे, पुन्हा कुणी अशी हिंमत करू नये ,अशा दबावतंत्राचा वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केल्यास यापुढे देश भर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रमुख तथा उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक, दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे )यांनी दिला आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष जिग्नेश मेवानी यांना आसामच्या पोलिसां करवी गुजरात सरकारने अटक करून आसाम मध्ये आले होते. तेथील न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर, एका महिला पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना वेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत. असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे) यांनी दिला आहे. भविष्यात कोणत्याही कर्मचार्‍यावर,कार्यकर्त्यावर! अधिकाऱ्यावर अन्याय, अत्याचार झाल्यास आपण खंबीर पणे त्याचा मुकाबला करून कायदेशीर न्याय मिळवून देऊ. असे आश्वासनही राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने निवृत्तीराव सांगवे(सोनकांबळे) यांनी दिले आहे.

About The Author