येणारा काळ भारतीय जनता पक्षाचा – उस्तुरे

येणारा काळ भारतीय जनता पक्षाचा - उस्तुरे

 उदगीर (प्रतिनिधी) : भविष्यात येणारा काळ हा  भारतीय जनता पक्षाचाच असणार आहे.या साठी आपण सर्व ते  प्रयत्न करू असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे नूतन शहर सरचिटणीस सतीश  रेवप्पा ऊस्तुरे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाला संघटन बांधणी साठी आवश्यक असणाऱ्या तरुणांचा समावेश करून, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकारणी मध्ये बराच फेरबदल केला आहे. नूतन कार्यकारणी मध्ये सतीश ऊस्तुरे यांना शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे, त्यांचा दांडगा जनसंपर्क विचारात घेऊन ते निश्चितपणे प्रभावी कार्य करतील, असा विश्वासही नेत्यांनी बोलून दाखवला आहे.

 याप्रसंगी अडवोकेट दत्ताजी पाटी!ल माजी आमदार सुधाकर भालेराव, तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज पुदाले, माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, माजी नगरसेवक आनंद बुंदे, युवा नेते माधव टेपाले,भाजपा युवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 सत्काराला उत्तर देताना सतीश ऊस्तुरे यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव सर्वसमावेशक आणि सर्वांना घेऊन चालणारा पक्ष असल्याने या पक्षाला भविष्य आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील एक गणमान्य नेतृत्व म्हणून जग पाहत आहे. अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे याला भाग्य लागते .सुदैवाने भारतीय जनता पक्षाने आपल्याला ही संधी दिली असून येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत साम-दाम-दंड-भेद या सर्व नितीन चा वापर करून भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देणे एवढंच आपलं कर्तव्य आहे. आपल्यावर पक्षाने एवढा मोठा दाखवलेला विश्वास आपण निश्चितपणे सार्थ करून दाखवू असेही त्यांनी सांगितले.

About The Author