संजय राठोड एक योद्धा नेतृत्व – सतीश उस्तुरे

संजय राठोड एक योद्धा नेतृत्व - सतीश उस्तुरे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यात वेगवेगळे पक्ष सक्रिय असून अनेक पक्षातील कार्यकर्ते हे आपले तत्व प्रमाणमाणून कार्य करत असतात. असे असले तरीही अत्यंत आक्रमक आणि सत्याला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून संजय राठोड यांनी अगदी निर्भीडपणे काम केले आहे करत आहेत.

आज पर्यंत केलेल्या त्यांची पक्षनिष्ठा आणि एकूण कामकाजाचा दाखला म्हणूनच पक्षाने पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून ते अत्यंत कर्तबगार पणे काम करतील असा विश्वास मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक, मातृभूमी नर्सिंग स्कूल, कस्तुरबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी सीबीएससी स्कूल अशा अनेक संस्था स्थापन करणारे आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती करणारे सतीश उस्तुरे यांनी व्यक्त केला आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय राठोड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते.
जे जे चांगले, त्यांचे स्वागत आम्ही करू. हे धोरण ठेवून मातृभूमी प्रतिष्ठान कार्य करत असते. त्याचाच एक भाग म्हणून संजय राठोड यांचा सत्कार याठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश उस्तुरे, सौ उस्तुरे, कुलकर्णी याही उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या वतीने संजय राठोड यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना संजय राठोड यांनी स्पष्ट केले की, गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य केले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणे असेल किंवा शासकीय भूमिकेच्या विरोधात, जनहिताच्या भूमिका असतील, पक्ष अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा आदेश प्रमाण माणून आपण कार्य केले आहे. भविष्यात देखील आदर्श कार्य करून दाखवू. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला फार मोठी जबाबदारी सोपवली आहे. याची जाणीव आपण कायम ठेवून पक्षाला खाली मान घालावी लागेल असे कोणतेही कृत्य कदापि आपल्या हातून होणार नाही. असा विश्वासही याप्रसंगी संजय राठोड यांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन प्राध्यापक बिभीषण मद्येवाड यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!