प्रहार महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सौ.कांचन भोसगे यांची निवड
लातूर : राज्यमंत्री नामदार बच्चु कडू यांच्या राजकीय अस्तित्व व सामाजिक विचारावर आधारित प्रहार जनशक्ती पक्षा अंतर्गत प्रहार महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. विमलताई अनारसे यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या हस्ते नियुक्तीपञ जळकोट,देवणी उदगीर येथील आढावा बैठकीत देऊन महिला आघाडीच्या लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
कांचन भोसगे यांनी गेल्या एक वर्षात उदगीर तालुका अध्यक्ष म्हणून चांगले काम केले महिला संघटन वाढवणे महिलेच्या कोणत्याही अडचणीला मदत ते करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली
यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष – राजाभाऊ चौगुले,जिल्हा उपाध्यक्ष – विनोद तेलंगे ,जिल्हा उपाध्यक्ष -नितीन जाधव , उदगीर तालुकाध्यक्ष -रविकिरण बेळकुंदे ,उदगीर -जळकोट विधानसभा अध्यक्ष-सुर्यभान चिखले उपाध्यक्ष बंडेप्पा पडसलगे ,ता.उपाध्यक्ष संदीप पवार उदगीर प्रहार महिला आघाडीच्या उपाध्यक्ष – विजयमाला पवार ,ता . सरचिटणीस – जयश्री चव्हाण ,ता. उपाध्यक्ष -सुजाता देवरे ,ता.सरचिटणीस -प्रेमलता भंडे, ता.सरचिटणीस -कुमुदिनी पांचाळ ,ता . कार्याध्यक्ष -शकुंतला रोडेवाड ,ता .सरचिटणीस -विजयमाला मठपती ऐश्वर्या काकडे,इत्यादींसह महीला व युवतींनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.