अखेर अहमदपूर स.नं. 4 कबालनाम्या बाबतच्या नोटीसा वाटप..!
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम करून कबालनामे देण्याच्या संबंधाने नोटीसा देण्याचे जाणीव पूर्वक प्रलंबीत ठेवून फाईल लपवून ठेवण्याच्या घटनेचा जाहीर निषेध करीत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढताच खडबडून जागी झालेल्या तहसिल प्रशासनाने तातडीने लाभार्थ्यांना नोटीसा वाटपास सूरूवात केली. आज प्रभागातील अतिक्रमण धारकाच्या वतीने कबालनाम्यासाठी पैसे भरण्याची नोटीस देवून तातडीने कबलनामे वाटप करण्याची मागणी घेवून युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिलकार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता.
उपविभागीय अधिकारी यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी तहसिलदार यांना आदेश देवून सूध्दा राजकीय दबावापोटी येथील नागरिकांना पैसे भरण्याच्या नोटीसा दिल्या नाहीत.ही बाब लक्षात घेवून या प्रकरणाचा पाठपूरवा करणारे युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी प्रभागातील नागरीकांना सोबत घेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून एक महिण्याच्या आत नोटीसा द्याव्यात अन्यथा तीव्र अंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.मात्र तब्बल महीना उलटून सूध्दा प्रशासनाने कूठलीच कारवाई केली नाही.शेवटी आज येथील प्रभागातील अतिक्रमण धारकांना घेवून मोर्चा काढण्यात आला.तसेच धरणे व निदर्शने अंदोलन करण्यात आले.प्रसंगी कठोर भूमीका घेण्याची जनतेची मानसिकता पाहून प्रशासनाने लागलीच अतिक्रमण धारकांना नोटीसा वाटप करण्यास सूरूवात झाली.
गेल्या कित्येक वर्षापासूनचा अतिक्रमण कायम करण्या बाबतचा लढा आज यशस्वी झाला असून अंदोलनाचा दणका बसताच प्रशासनाने आज अखेर अतिक्रमण धारकांना पैसे भरण्याच्या नोटीसा जारी केल्या आहेत.पूढील महिना भरायच्या आत पैसे भरून घेवून कबालनामा वितरीत करावा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे फार्म भरून घेवून घरकूल मंजूर करून द्यावे अशी आग्रही मागणी या वेळी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गिरीष गोंन्टे सर यांनी केले.तर या प्रसंगी शेख शेकूभाई,हाजी शेख,जाबेरखान पठाण, अण्णाराव सूर्यवंशी,मनोज मून्ना कांबळे,फरदीनभाई, प्रशांत जाभाडे आदींचे भाषणे झाली.शेवटी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आभार प्रदर्शन आकाश सांगवीकर यांनी मानले. या मोर्चाला सय्यद याखूबभाई,प्रफुल्ल ढवळे,मोहम्मद पठाण,शेख नूरभाई, मनोज मून्ना कांबळे, शरद बनसोडे,आसेफखान पठाण, सतिश कदम, सिध्दार्थ वाघमारे, राहूल गायकवाड,संगमेश्वर बनसोडे, दिलीप भालेराव, आकाश सांगविकर, मोहसीन सय्यद, अजय भालेराव, मूकूंद बाळासाहेब वाघमारे,शेख ईमरान, शरद सोनकांबळे,प्रदीप सांगवीकर,रवी बनसोडे, शेख फरीद अहमद, शेख अस्लम,सय्यद नौशाद, प्रकाश लांडगे,राम कांबळे,पीटी कांबळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.