शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील विनाअनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षक समन्वय संघाचे हे धरणे आंदोलन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा-कॉलेजला निधी तात्काळ घोषित करावेत, २० % व ४०% शाळा कॉलेजांना प्रचलित नियमानुसार १००% टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा ,मुंबई स्तरावरील अघोषित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय निधी सह घोषित करण्यात यावेत, अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण लागू करण्यात यावे, प्रलंबित असलेली शालार्थ प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत आदी प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लातूर जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाबासाहेब वाघमारे, चंद्रकांत कदम, दिनकर नीकम, संतोष उपासे, प्रविण खलंग्रे,समीयौद्दिन काझी,माधव जाधव, उद्धव श्रंगारे, मिनाक्षी तौर, संगीता आबंदे, श्रीमती सुजाता बुरगे,हरीश्चंद्र आरदवाड, शहाजी कदम,महेश पाटील, विठ्ठल गोमारे, मदनलाल भन्साळी, संतोष सोमवंशी आदी सह जिल्हाभरातील अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.

About The Author