तुकाराम मुंढेंचे शनिवारी अहमदपुरात व्याख्यान
अहमदपूर (गोविंद काळे ) : भारतीय प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तव्यनिष्ठ कामाने ठसा उमटविणारे तुकाराम मुंढे यांचे अहमदपुरात शनिवारी ‘मला जिंकायचंय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विश्वविद्यालयाच्या वतीने व या विद्यालयाचे संस्थापक शंकर गुट्टे यांच्या पुढाकारातून सदर व्याख्यान होत असून या व्याख्यानास अहमदपूर तालुक्यासह जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना येथे ३० जून १ ९ ७५ रोजी जन्म घेतलेले तुकाराम मुंढे यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेत घेतले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी औरंगाबाद येथे उच्चशिक्षण पूर्ण केले. २००१ साली राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळविल्यानंतर केंद्रीय सेवा आयोगाच्या परिक्षेत २००५ साली तुकाराम मुंढे उत्तीर्ण झाले. सोलापूर येथून भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात करणारे तुकाराम मुंढे यांनी आजतागायत राज्यातील विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य केले आहे . आपल्या कर्तव्यनिष्ठ व शिस्तबध्द कार्यशैलीमुळे राज्यभरात परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई, औरंगाबाद, त्याचबरोबर येथील प्रशासकीय अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा झाली आहे. सोलापूरचे सोलापूर सेवेची जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजनेमध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील त्यांची आणि कारकिंद देशातील प्रत्येक युवकांसाठी आदर्शदायी असून संकल्प इच्छाशक्तीच्या जोरावर काय होऊ शकते, तुकाराम मुंढे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अहदमपूर येथे ‘मला जिंकायचंय’ याविषयी त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सायं. ५ वाजता जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जि. प. चे सीईओ अभिनय गोयल व मनपा आयुक्त अमन मित्तल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.