उदगीरच्या खेळाडूने देश पातळीवर नेतृत्व करावे – विजयकुमार नीटूरे
उदगीर (एल.पी .उगिले) : उदगीर शहर म्हटले की कधी काळी क्रीडा, संस्कृतीक, आणि शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शहर म्हणून नावाजले गेले होते .उदगीर शहरातील खेळाडूने तर जागतिक पातळीवर आपले वर्चस्व गाजवले होते. क्रीडा क्षेत्राला तेच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत .असे विचार लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते विजयकुमार राजेश्वर निटुरे त्यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
उदगीर शहरातील क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. दिनांक 13 मे 26 मे यादरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या भागातील नामांकित संघांनी लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला आहे.
गेल्या दोन वर्षात कोविड विषाणूच्या संसर्गामुळे प्रत्येक खेळ बंद होते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना खेळापासून दूर राहावे लागले. ही संधी आम्ही पुन्हा प्राप्त करून दिली आहे. असेही विजयकुमार निटूरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, महेश बंडे श्रीनिवास एकुर्केकर, माजी नगरसेवक अहमद सरवर, बिपिन जाधव सद्दाम बागवान,फैवयाज डांगे,प्रकाश गायकवाड,शिवाभोपळे,आशिश ठाकूर,नय्यर पठाण,जावेद शेख,यशवंत पाटील,अजय कबाडे,शाह गायकवाड,अविनाश गायकवाड,नागेश पठवारी,नंदकुमार पटणे,बाबाससाहेब सुर्यवंशी,संजीव काळे,ओमकार गांजुरे ,ज्ञानेश्वर नादरगे,बालाजी जगताप,रविकिरण पाटिल,अजय पारखे,बबलु खुरेशी व युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते .
पुढे बोलताना विजयकुमार निटुरे यांनी स्पष्ट केले की ,लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रत्येक तालुक्याला स्टेडियम व्हावे ,प्रत्येक तालुक्यातील खेळाडू महाराष्ट्र पातळीवर पोहोचावा. असा उदात्त हेतू ठेवून खेळासाठी विशेष प्राधान्य दिले होते.तोच आदर्श कायम ठेवून लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख ,युवा नेते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख हे देखील क्रीडा क्षेत्राला गतवैभव प्राप्तकरून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत
त्याचाच एक भाग म्हणून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन उदगीर शहरात करण्यात आले आहे .
अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन विद्यार्थी मैदानी खेळाकडे आकर्षित होईल, सद्यस्थितीत खेळाडू हे मैदानाऐवजी संगणकीय खेळाकडे वळू लागले आहेत हे अत्यंत धोकादायक आहे.
त्यासाठी खेळाडूंनी मैदानी खेळाकडे वळावे, ज्यामुळे शारीरिक क्षमता आणि सुदृढ शहरांमध्ये सुदृड मन राहील. हा विचार डोळ्यासमोर ठेवून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले .
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. हार आणि जीत पचवण्याची क्षमता मैदानी खेळामुळे निर्माण होते. त्यासाठीच मैदानी खेळ अतिशय आवश्यक आहेतक असे विचार व्यक्त केलेक या स्पर्धेसाठी उदगीर शहरातील आणि परिसरातील खेळाडू आणि नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. उदगीर शहरातील जिल्हापरिषद मैदानावर 26 तारखे पर्यंत खेळाडूंना ही मेजवानी मिळणार असल्याने क्रिडा प्रेमी मध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.