बंजारा समाजातील पाच महिलांचा तळ्यात बुडून मृत्यू

बंजारा समाजातील पाच महिलांचा तळ्यात बुडून मृत्यू

अहमदपूर (गोविंद काळे) : तुळशीराम तांडा तालुका अहमदपूर येथील घटना. मोजमाबाद तांडा, रामापूर तांडा ता. पालम येथील बंजारा समाजाचे कुटुंब काम करण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील उजना गावच्या शिवारामध्ये आलेले होते.तुळशीराम तांडा जवळील तलावांमध्ये सकाळी महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असताना एकीचा पाय घसरला आणि तिला वाचण्यासाठी गेलेल्या पाचही महिलांचा बुडून मृत्यू झाला.ही दुर्देवी घटना सकाळी साडे आठच्या दरम्यान घडली.मयत मुली आणि महिलांची नावे 1. राधाबाई धोंडीबा आडे रामपूर तांडा वय 45 वर्ष 2. काजल धोंडीराम आडे वय 19 वर्षे राहणार रामपूर तांडा 3. दीक्षा धोंडिबा आडे वय वर्ष 22 राहणार रामपूर तांडा 4.सुषमा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा तालुका पालम वय 21 वर्ष 5. अरुणा संजय राठोड राहणार मोजमाबाद तांडा वय 25 वर्ष अशा पद्धतीने मयत महिलांची नावे असून उत्तरीय तपासणीसाठी अहमदपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहे. केवळ पोट भरण्यासाठी आलेल्या बंजारा समाजातील गरीब कुटुंबावर अचानक हा घाला आलेला असून संपूर्ण बंजारा समाजात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. अहमदपूर तालुक्याचे आ. बाबासाहेब पाटील साहेब यांनी नाही तात्पुरती मदत म्हणून काही आर्थिक मदत केल्याचे कळाले आहे. सदरील कुटुंबाचे संसार उध्वस्त झालेले असून त्यांना शासनाकडून जी काही मदत मिळवून देता येईल तेवढी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ. बाबासाहेब पाटील यांनी दिले.

About The Author

error: Content is protected !!