बालाजी वाघमारे यांना ‘बार्टी’ कडून 21 लाखाची फिलोशिप मंजूर

बालाजी वाघमारे यांना 'बार्टी' कडून 21 लाखाची फिलोशिप मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : घरची परिस्थिती अतिशय हलाखीची… वडील इतरांच्या शेतात मजुरी करायचे. घरात नेहमीच आर्थिक चणचण ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वतः शिक्षित होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन चक्क लातूर भाडगाव हा प्रवास सायकलीवर करीत बालाजी वाघमारे या युवकाने आपले शिक्षण पूर्ण केले. बघता बघता शिक्षणात पोएचडीपर्यंत मजल मारली. पीएचडीचे शिक्षण पूर्ण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे (बार्टी) कडून तब्बल 21 लाख रुपयांची फेलोशिप मंजूर झाली आहे.

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करीत बालाजी वाघमारे यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास सुरु केला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील शेतमजूर तर आई गृहिणी आपण शिक्षण घेतले तर आणि तरच या परिस्थितीवर मात करू शकतो हे माहीत असल्याने अगदी तशा परिस्थितीतही भाडगाव व लातूर हा प्रवास अक्षरशः सायकलीवर करून शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, भाडगाव येथून पूर्ण केले. दहावीत गावातून पहिला येण्याचा मान प्रा.डॉ.लहू दिगंबर बाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथून पीएचडी संशोधनाचे काम सुरु आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतही इतक्या पदव्या मिळविणे हे खरोखरच इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल मिळविला. महाविद्यालयीन शिक्षण॥ ते बीए राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले. एम.ए. (मराठी) दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले.

नंतर सीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन मानवेंद्र अध्यापक महाविद्यालय, जळकोट येथे शिक्षण घेऊन बीएड पूर्ण केले, तर एम.एड. राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयात झाले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, नांदेड येथून एम. फिल. पदवी मिळवली. शाहू-फुले-आंबेडकर एक वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम नांदेड विद्यापीठातून पूर्ण केला. यासोबतच डिप्लोमा इन स्कुल मॅनेजमेंट हाही अभ्यासक्रम पूर्ण केला सध्या

दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने बालाजी वाघमारे यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अब्दुल रब उस्ताद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य प्रा. अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. साळुंके सर कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांची उपस्थिती होती. बालाजी बाघमारे यांच्या या उत्तुंग यशाबद्दल पालकमंत्री ना. अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी आदीसह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

About The Author