आंबेडकरी चळवळीला गती देण्यासाठी 16 जून चा कार्यक्रम – निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे
उदगीर (प्रतिनिधी) : राज्य सरकार आणि केंद्र सरकार आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आंबेडकर चळवळीतील सर्व नेते एक झाल्यानंतर चार खासदार एकाच वेळी निवडून आले होते. त्यापेक्षाही जास्त शक्ती आंबेडकर चळवळीची आहे. मात्र या राजकीय पक्षातील नेत्यांनी आंबेडकर चळवळीला इंग्रजी राजवटी प्रमाणे फोडा आणि झोडा ही नीती अवलंबून पदाची लालूच देऊन फूट पाडली आहे.ही फुट मिटून देशभरातील आंबेडकर चळवळ एक होईल, सर्व नेते एक होतील. यादृष्टीने आपले प्रयत्न आहेत. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कर्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या कारणाने आंबेडकर चळवळीला घाबरून ही चळवळ संपली पाहिजे, या पद्धतीने कार्य करत आहे. मात्र 16 मे रोजी केवळ महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या सीमावर्ती भागातील राज्यातील नेतेच नव्हे तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील निरीक्षकही उपस्थित राहत आहेत. सर्व छोटे छोटे पक्ष आणि गट तट बाजूला ठेवून, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे. या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
राज्यातील आक्रमक नेतृत्व आमदार जिग्नेश भाई मेवानी यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आला. मात्र त्यांची लोकप्रियता, त्यांचे काम आणि समाजाने त्यांना दिलेला पाठिंबा! यामुळे शेवटी सरकारला त्यांच्या पुढे झुकावे लागले. हीच ताकद आणखी वाढविण्यासाठी, आपली चळवळ आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण ताकतीने राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे काम करणार असून सर्व गट-तट बाजूला ठेवून आंबेडकर चळवळीला गतिमान करण्यासाठी आणि आमच्या चळवळीच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा सरकारला देण्यासाठी 16 मे चा कार्यक्रम असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे), राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सुष्मिता माने, युवा नेते रवी जवळे, बंटी घोरपडे,जलील चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, दलित मुस्लीम ऐक्य परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.